Join us  

सोने किंवा म्युच्युअल फंड, कोरोनाच्या संकटात कोणती गुंतवणूक फायद्याची?, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 5:05 PM

परताव्याची चांगली हमी असते. गुंतवणुकीत सहजता, SIPमार्फत कमी जोखीम घ्यावी लागत असल्याची मुख्य वैशिष्ट्ये आहेत.

कोरोना काळात देशासमोर मोठं आर्थिक संकट उभं ठाकलं आहे. त्याामुळे बरेच लोक सुरक्षित गुंतवणुकीबद्दल विचार करत आहेत. पारंपरिकपणे सोने हा भारतीयांसाठी गुंतवणुकीचा पसंतीचा पर्याय आहे. केवळ अनिश्चिततेच नव्हे, तर महागाईच्या काळातही सामना करण्यासाठी हे एक प्रभावी साधन मानले जाते. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक देखील बर्‍याच वर्षांमध्ये लोकप्रिय झाली आहे. त्यात परताव्याची चांगली हमी असते. गुंतवणुकीत सहजता, SIPमार्फत कमी जोखीम घ्यावी लागत असल्याची मुख्य वैशिष्ट्ये आहेत.2020मध्ये आर्थिक बाजारपेठ अस्थिर राहिली आहे. इक्विटी आणि कर्ज म्युच्युअल फंडांमध्ये भयंकर चढ-उतार दिसून आला आहे. दुसरीकडे जास्त मागणी आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे सोन्याच्या किमती वाढत आहेत. 2020मध्ये सोन्याने 50,000 रुपयांची पातळी गाठली आहे. 2018च्या तुलनेत यात जवळपास 60% वाढ झाली आहे. तज्ज्ञांचा अंदाज आहे की, कोरोनाच्या अनिश्चिततेमुळे सोन्याची मागणी आणि त्याची किंमत आणखी वाढू शकते.अशा वेळी आपण सोने किंवा म्युच्युअल फंड यापैकी गुंतवणूक कोठे करावी? याचा विचार गुंतवणूकदारांना सतावत असतो. गुंतवणूकदार संपत्ती वर्गासाठी समान पर्याय शोधत असतात.  सर्वांत उत्तम पर्याय म्हणजे संपत्ती वर्गात गुंतवणूक करणे आणि बाजारातील अस्थिरता, आर्थिक अनिश्चिततेपासून चांगले संरक्षण करणे. आर्थिक उद्दिष्टे, परताव्याची अपेक्षा, जोखीम आणि तरलतेच्या गरजेनुसार सोने आणि म्युच्युअल फंड या दोन्हीमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.गुंतवणुकीचा दृष्टीकोन लांब ठेवून इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे अधिक चांगले असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दीर्घ मुदतीमध्ये, इक्विटीमध्ये इतर कोणत्याही संपत्ती वर्गापेक्षा जास्त परतावा मिळण्याची क्षमता असते. अशा संपत्ती वर्गामध्ये सोन्याचा समावेश आहे. दुसरीकडे अनेक विश्लेषकांचे मत आहे की, सोन्यातील गुंतवणूक केवळ पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यासाठी केली पाहिजे. सोने हा गुंतवणुकीचा पर्याय नाही. हे आर्थिक धक्क्यापासून संरक्षणासाठी भरलेल्या प्रीमियमसारखे आहे. एकूण पोर्टफोलिओपैकी केवळ 5-10 टक्के सोन्यात गुंतवणूक करावी. त्याच वेळी इक्विटी म्युच्युअल फंडांची चिंता आहे, एखाद्याने जोखीम पाहूनच मग गुंतवणूक करावी. 

टॅग्स :गुंतवणूक