मराठा चेंबरच्या अध्यक्षपदी सतीश मगर
By admin | Updated: September 29, 2014 23:14 IST
मराठा चेंबरच्या अध्यक्षपदी सतीश मगर
पुणे : मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर च्या अध्यक्षपदी उद्योजक सतीश मगर यांची निवड करण्यात आली आहे़ मराठा चेंबरच्या ८० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली़ मावळते अध्यक्ष एस़ के़ जैन यांनी त्यांच्याकडे सुत्रे सोपविली़ उपाध्यक्षपदी विक्रम साळुंके, प्रकाश छाब्रिया आणि प्रदीप भार्गव यांची निवड करण्यात आली़ नव्या पदाधिकार्यांचा कार्यकाल दोन वर्षांचा असणार आहे़ यावेळी चेंबरचे महासंचालक अनंत सरदेशमुख, खजिनदार चंद्रशेखर चितळे आदि उपस्थित होते़ ़़़़़़़़़़़फोटो : सतीश मगर यांचा घेणे