Join us
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीत समाधानी; तरीही निष्ठावान नाही!

By admin | Updated: April 3, 2015 23:54 IST

दहापैकी सात कर्मचारी त्यांच्या सध्याच्या नोकरीत समाधानी असले तरी ते नव्या संधीच्या शोधात आहेत. करिअर बिल्डर इंडियाने केलेल्या सर्वेक्षणात म्हटले

नवी दिल्ली : दहापैकी सात कर्मचारी त्यांच्या सध्याच्या नोकरीत समाधानी असले तरी ते नव्या संधीच्या शोधात आहेत. करिअर बिल्डर इंडियाने केलेल्या सर्वेक्षणात म्हटले आहे की आहे त्या नोकरीत समाधानी असणे याचा अर्थ असा नाही की त्यांना त्याच नोकरीत कायम राहायचे आहे.सर्वेक्षणात म्हटले आहे की, ७१ टक्के कर्मचारी आपल्या नोकरीबद्दल समाधानी व पुष्कळच समाधानी असले तरी त्यातील ६३ टक्के लोकांनी आम्ही नियमितपणे नव्या नोकऱ्यांच्या शोधात असल्याचे सांगितले. अर्थव्यवस्थेचे भविष्य सकारात्मक दिसू लागताच नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी नव्या संधी निर्माण होत आहेत व पुढील चित्रही चांगले असण्याची शक्यता आहे.नोकऱ्या सांभाळून ठेवण्याचा कर्मचाऱ्यांचा कल अलीकडच्या काळात पूर्णत: बदलून नोकरी सोडण्याकडे कल वाढला आहे.