Join us

सानिया, कारा फायनलमध्ये

By admin | Updated: August 11, 2014 02:17 IST

भारताची अनुभवी टेनिसपटू सानिया मिर्झा आणि झिम्बाब्वेची कारा ब्लॅक यांनी रॉजर्स चषक टेनिस स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करताना फायनलमध्ये प्रवेश केला आहे़

माँट्रियल : भारताची अनुभवी टेनिसपटू सानिया मिर्झा आणि झिम्बाब्वेची कारा ब्लॅक यांनी रॉजर्स चषक टेनिस स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करताना फायनलमध्ये प्रवेश केला आहे़ अजिंक्यदासाठी आता सानिया आणि कारा यांना स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळविणाऱ्या सारा इराणी आणि रॉबर्टा विंची यांचा सामना करावा लागणार आहे़ स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारत आणि झिम्बाब्वेच्या चौथे मानांकनप्राप्त जोडीने चिनी तैपेईची सेई सू वेई आणि चीनच्या पेंग शुआई या जोडीचा १ तास आणि ५० मिनिटे रंगलेल्या लढतीत ७-६, ३-६, १३-११ अशा फरकाने पराभव केला़ सानिया आणि कारा यांनी पहिल्या सेटमध्ये पॉइंट वाचविले आणि त्यानंतर टायब्रेकरमध्ये विजय मिळविला. मात्र, त्यांनतर सू वेई आणि पेंग यांनी दुसऱ्या सेटमध्ये कमबॅक करताना हा सेट ६-३ असा सहज आपल्या नावे केला़ तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये सानिया आणि कारा यांनी एकवेळ ९-६ अशी आघाडी मिळविली होती. मात्र, प्रतिस्पर्धी खेळाडूंनी जोरदार मुसंडी मारीत ११-२० असा स्कोअर केला. तथापि, यानंतर सानिया आणि कारा यांनी आक्रमक खेळ करीत, तीन गुणांची कमाई करीत सेटसह सामन्यात बाजी मारली़ (वृत्तसंस्था)