Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाळूज ५

By admin | Updated: August 21, 2014 19:33 IST

बजाज ऑटोच्या कामगारांना १० हजारांची पगारवाढ

बजाज ऑटोच्या कामगारांना १० हजारांची पगारवाढ
वाळूज महानगर : बजाज ऑटो कंपनीतील कामगारांना प्रतिमाह १० हजार ५० रुपयांची भरघोस पगारवाढ करण्यात आली आहे. यात ९,२०० रु. थेट व बाकीचे अप्रत्यक्षरीत्या मिळणार आहेत. ही पगारवाढ साडेतीन वर्षांसाठी लागू राहणार आहे.
कंपनी व्यवस्थापन व बजाज ऑटो एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष भाऊसाहेब वाघमारे यांच्यात कामगारांच्या पगारवाढीसंदर्भात चर्चा होऊन कामगारांच्या मागणीवरून व्यवस्थापनाने आज झालेल्या बैठकीत कामगारांना पगारवाढ करण्यात आल्याचे जाहीर केले. मागील करारात ६,५०० रु. पगारवाढ होती. यावेळी ती १० हजार ५० रुपये करण्यात आली आहे. यापैकी ५५ टक्के म्हणजेच ९,२०० रु. प्रत्यक्ष, तर ४५ टक्के म्हणजेच ८५० रु. अप्रत्यक्ष मिळणार आहेत. लग्न व शैक्षणिक कर्ज म्हणून ६०-६० हजार, तर दिवाळी उचल म्हणून ६ हजार रुपये मिळणार आहेत. तसेच कॅशलेस पॉलिसीच्या नावाखाली प्रत्येक कामगाराचा प्रतिवर्षी १ लाखापासून ५ लाखांपर्यंत आरोग्य विमा काढण्यात येणार आहे. यामध्ये पती-पत्नी, दोन मुले व आई-वडील यांना लाभ घेता येणार आहे. शिवाय या करारात कामगारांना कामावर येण्यास ५ मिनिटे उशीर झाला की ६६ रुपये कापण्याची पद्धतही बंद करण्यात आली असून, कामगारांना अधिक सकस आहार मिळणार आहे. मागील करार ३१ जुलै रोजी संपला असला तरी हा करार १ ऑगस्टपासून कामगारांना लागू करण्यात आला असल्याने कामगारांचा एकही दिवस वाया जाणार नाही.
या कार्यक्रमाला बजाज ऑटो एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष भाऊसाहेब वाघमारे, सचिव प्रमोद फडणीस, कोषाध्यक्ष जितेंद्रसिंह राजपूत, उपाध्यक्ष प्रकाश मांडरे, काशीनाथ चौधरी, कार्याध्यक्ष विजय पवार, सहसचिव प्रभाकर भोसले, देवीदास पवार, सहकोषाध्यक्ष सत्यविजय देशमुख, माजी अध्यक्ष बाजीराव ठेगडे, विठ्ठल कांबळे, मोतीराम कांबळे, तर कंपनी व्यवस्थापनच्या वतीने उपाध्यक्ष कैलास झांझरी, दत्ता नार्वेकर यांच्यासह कामगारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

फोटो ओळ -
बजाज ॲाटो कंपनीतील कामगारांना पगारवाढ करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर कामगारांना मार्गदर्शन करताना, तर दुसर्‍या छायाचित्रात उपस्थित कामगारांची गर्दी दिसत आहे. (छाया- आतिश वानखेडे.)
फोटो क्रमांक - २१ ऑगस्ट, मार्गदर्शन व गर्दी