Join us

सॅमसंगचा रूमालाप्रमाणे घडी होणारा स्मार्टफोन

By admin | Updated: February 9, 2017 16:13 IST

बार्सिलोनामध्ये मोबाइल वर्ल्ड कॉंग्रेसचं आयोजन, विशेष लक्ष असणार सॅमसंगच्या फोल्डेबल स्क्रीनच्या स्मार्टफोनवर

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 -  26 फेब्रुवारीला बार्सिलोनामध्ये मोबाइल वर्ल्ड कॉंग्रेसचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये जगातील छोट्या मोठ्या सर्वच स्मार्टफोन कंपन्या नव-नवे डिव्हाइस सादर करत असतात.  यावेळी विशेष लक्ष असणार आहे ते सॅमसंग कंपनीवर. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या  फोल्डेबल स्क्रीनचा स्मार्टफोन कंपनी सादर करणार असल्याचं वृत्त आहे. ब-याच दिवसांपासून या फोनबाबत चर्चा होत असल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
 
हा फोल्डेबल फोन मोबाइल वर्ल्ड कांग्रेसमध्ये सार्वजनिकरित्या नाही तर एका खासगी कार्यक्रमात कंपनी सादर करू शकते असं वृत्त आहे. सॅमसंग कंपनीकडून अधिकृतपणे याबाबत माहिती दिलेली नाही मात्र, मोबाइल वर्ल्ड कांग्रेसमध्ये कंपनीचे काही वरिष्ठ अधिकारी या प्रोजेक्टवरून परदा उठवू शकतात अशी दाट शक्यता आहे. 
 
मार्च 2015 मध्ये सॅमसंगने आपण फोल्डेबल स्मार्टफोनवर काम करत असल्याची अधिकृत घोषणा केली होती.