Join us

सॅमसंगचा "गॅलक्सी J3 प्रो" बजेट स्मार्टफोन भारतात लॉन्च

By admin | Updated: April 5, 2017 13:01 IST

दक्षिण कोरियाची इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंग कंपनीने आपला बजेट स्मार्टफोन गॅलक्सी J3 प्रो लॉन्च केला

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - दक्षिण कोरियाची इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंगने आपला बजेट स्मार्टफोन  गॅलक्सी J3 प्रो लॉन्च केला आहे. गोल्ड, ब्लॅक आणि व्हाईट  या रंगांमध्ये हा फोन उपलब्ध आहे. केवळ पेटीएमवर या फोनची विक्री सुरू आहे. सॅमसंग कंपनीकडून एखाद्या फोनची ऑनलाइन  ई-कॉमर्स वेबसाइटवर विक्री करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 
 
हा फोन चीनमध्ये गेल्या वर्षीच लॉन्च करण्यात आला होता. सॅमसंग J सिरीजच्या अन्य फोनप्रमाणे या फोनच्या फ्रेमलाही मेटल फिनिशींग देण्यात आली आहे. तसेच अन्य गॅलक्सी स्मार्टपोनप्रमाणे यामध्येही होम बटन देण्यात आलंय. 
 
फोनमध्ये 5 इंच एचडी 720×1280 पिक्सल  सुपर एमोलेड  डिस्प्ले आहे. तसेच 1.2 गीगाहर्त्झ क्वॉड-कोर प्रोसेसर आणि 2 जीबी रॅमसह हा फोन उपलब्ध आहे. या फोनमध्ये इंटरनल मेमरी 16 जीबी असून 128 जीबीपर्यंत मेमरी ती वाढवता येऊ शकते.  ड्यूल सिम सपोर्ट असलेला हा फोन अॅन्ड्रॉइड 5.1 लॉलीपॉपवर आधारित आहे. फोनमध्ये 8 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, 4जी, जीपीआरएस, 3जी, वाय-फाय, ब्ल्यूटूथ आणि मायक्रो यूएसबी हे फीचर देण्यात आलेत. याशिवाय यामध्ये 2600 mAh बॅटरी देण्यात आली आहे. 
 
हा बजेट स्मार्टफोन असल्याने याची किंमत 8,490 रुपये इतकी आहे.