मुंबई - सोनालिका ट्रॅक्टर्सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात १ लाख ट्रॅक्टर्सची विक्री केली. चालू आर्थिक वर्षात पुन्हा १ लाख विक्रीचे लक्ष्य कंपनीने निश्चित केले आहे.सोनालिका इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी १९६९ पासून कृषी क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनीने १९९६ मध्ये छोट्या ट्रॅक्टर्सची निर्मिती सुरू केली. २००५ पासून पूर्ण क्षमतेचे ट्रॅक्टर्स तयार करीत आहे. कंपनीचा पंजाबमधील होशियारपूर येथे जगातील सर्वात मोठा एकात्मिक ट्रॅक्टर्स निर्मिती कारखाना आहे. वार्षिक ३ लाख ट्रॅक्टर्स निर्मितीची या कारखान्याची क्षमता आहे.सोनालिकाने २०१२-१३ या आर्थिक वर्षात ५०,८५३ ट्रॅक्टर्सचे उत्पादन केले होते. नंतर पाच वर्षांत २०१७-१८ मध्ये कंपनीने १ लाख ०१ ट्रॅक्टर्स विकले. यापैकी १२,७९१ ट्रॅक्टर्स मार्च २०१८ मध्ये विकण्यात आले. ८० टक्क्यांचा विकास दर कंपनीने मार्च महिन्यात गाठला. २०१७-१८ या आर्थिक वर्षाचा सरासरी विकास दर २२ टक्के राहिला.कंपनीचे कार्यकारी संचालक रमण मित्तल म्हणाले की, शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचे लक्ष्य केंद्राने निश्चित केले आहे. ते पूर्ण होण्यासाठी आम्ही प्रत्येक राज्यातील शेतकºयांना त्यांच्या गरजेनुसार ट्रॅक्टर तयार करून देतो. शेतकºयाच्या शेतातील मातीची स्थिती, हवामान, यानुसार आवश्यक असलेले कमी-अधिक क्षमतेचे व अतिरिक्त सुट्या भागांचे ट्रॅक्टर शेतकºयाला तयार करू दिले जाते.एक हजार प्रकारचे ट्रॅक्टर्ससोनालिकाकडे २० एचपीपासून ते १२० एचपीपर्यंतचे १,००० हून अधिक प्रकारचे ट्रॅक्टर्स उपलब्ध आहेत. सध्या सोनालिकाचे ट्रॅक्टर्स १०० देशांत असून, चार देशांमध्ये आघाडीवर आहोत. या वर्षी पाऊस चांगला पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या वर्षी आम्ही लक्ष्य पूर्ण करू, असा विश्वास आहे.
‘सोनालिका’च्या १ लाख ट्रॅक्टर्सची विक्री, १०० देशांत निर्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:47 IST