Join us
Daily Top 2Weekly Top 5

नव्या महामार्गांसाठी रोखे विक्री

By admin | Updated: August 8, 2016 04:47 IST

नव्या महामार्गांच्या कामांना गती देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआयई) रोखे विक्रीतून ५० हजार कोटी रुपये उभारणार आहे.

नवी दिल्ली : नव्या महामार्गांच्या कामांना गती देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआयई) रोखे विक्रीतून ५० हजार कोटी रुपये उभारणार आहे. यापैकी ५ हजार कोटी रुपयांचे रोखे भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ), तर १० हजार कोटींचे रोखे भारतीय आयुर्विमा महामंडळ घेणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अध्यक्ष राघव चंद्रा यांनी ही माहिती दिली. चंद्रा यांनी सांगितले की, ईपीएफओ आणि एलआयसी यांनी या गुंतवणुकीस मंजुरी दिलेली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने आपल्या या योजनेंतर्गत ईपीएफओला ५,००० कोटी रुपयांचे रोखे विक्री केले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)