Join us
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलच्या दरात रुपयाची कपात होण्याचे संकेत

By admin | Updated: July 29, 2014 23:30 IST

कंपन्यांच्या होणा:या आढावा बैठकीत पेट्रोलच्या दरात लीटरमागे एक रुपयाची कपात करण्याचे संकेत तेल कंपन्यांनी दिले आहेत.

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या कपातीच्या पाश्र्वभूमीवर येत्या 31 जुलै रोजी तेल कंपन्यांच्या होणा:या आढावा बैठकीत पेट्रोलच्या दरात लीटरमागे एक रुपयाची कपात करण्याचे संकेत तेल कंपन्यांनी दिले आहेत. तसे झाल्यास एप्रिल 2क्13 नंतर प्रथमच ग्राहकांना दिलासा मिळू शकेल.
गेल्या 15 दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत उतरण नोंदली गेली आहे. पुढच्या चार दिवसांतही जर हाच ट्रेंड दिसून आला, तर पेट्रोलच्या दरात किमान एक रुपयांची कपात होण्याची शक्यता आहे. या दरकपातीत स्थानिक दरांचा समावेश नसल्याने एक रुपयाची कपात झाल्यास विभागनिहाय या कपातीचा फायदा कमाल एक रुपया 3क् पैशांर्पयत होऊ शकतो. पेट्रोलच्या दरात कपातीचे संकेत असले तरी, अंशत: दर नियंत्रणमुक्त असलेल्या डिङोलच्या दरात मात्र नियमित अशी 5क् पैशांची वाढ अपेक्षित आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)