मुंबई : आंतर बँकिंग परकीय चलन बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया दोन पैशांनी वधारून ५९.२७ रुपये प्रति डॉलर झाला. त्यामुळे सलग दोन सत्रात रुपयाची घसरण अखेरीस थांबली.निर्यातदारांकडून डॉलरची अधिक विक्री झाल्याने रुपयाला बळकटी मिळाली, असे बाजारातील जाणकारांचे मत आहे.सुरुवातीला रुपया ५९.३२ प्रति डॉलरने उघडला. सत्रादरम्यान ५९.३७ ते ५९.२२ दरम्यान राहिलेला रुपया अखेरीस दोन पैशांनी सुधारून ५९.२७ प्रति डॉलरवर बंद झाला. (प्रतिनिधी)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}