Join us

डॉलरच्या तुलनेत रुपया वधारला

By admin | Updated: August 20, 2014 22:51 IST

बाजारात डॉलरची आवक झाल्यामुळे गेल्या तीन आठवडय़ांत प्रथमच रुपया डॉलरला 6क्.61 रुपयांर्पयत पोहोचला.

मुंबई : रुपया आज डॉलरच्या तुलनेत 6 पैसे वधारला. निर्यातदार आणि काही बँका डॉलरची विक्री करीत असल्यामुळे व बाजारात डॉलरची आवक झाल्यामुळे गेल्या तीन आठवडय़ांत प्रथमच रुपया डॉलरला 6क्.61 रुपयांर्पयत पोहोचला.
तथापि, स्थानिक स्टॉक मार्केट कमकुवत असल्यामुळे व परदेशात डॉलर मजबूत झाल्यामुळे रुपया वधारला, असे फोरेक्स डीलरने सांगितले.
आंतरबँक परकीय चलन बाजारात (फोरेक्स) रुपया 6क्.67 रुपयांवरून 6क्.82 रुपयांनी सुरू झाला व तो लगेच आयातदारांकडून (तेल शुद्धीकरण कंपन्या व परदेशात घट्ट असलेला डॉलर) डॉलरची मागणी वाढताच 6क्.88 रुपयांना पोहोचला. नंतर निर्यातदार व काही बँकांनी डॉलरची विक्री सुरू केल्यामुळे रुपया 6क्.61 रुपयांवर स्थिरावण्यापूर्वी तो 6क्.52 रुपयांवर स्थिरावला होता. आज रुपया 6 पैसे महागला (क्.1क् टक्के). गेल्या सलग 3 सत्रंमध्ये त्याच्या 6क् पैशांची (क्.98) वाढ झाली आहे.(वृत्तसंस्था)