नवी दिल्ली : रुपयामध्ये शुक्रवारी मोठी घसरण झाली. दोन वर्षांच्या नीचांकावर जात रुपया ६६.८८ प्रति डॉलरवर आज बंद झाला. अमेरिकेत व्याजदरात वाढ होण्याची शक्यता हे यामागचे एक कारण सांगितले जात आहे. सायंकाळी जारी करण्यात आलेल्या वृद्धीदरानुसार आॅक्टोबरमध्ये औद्योगिक वृद्धीदर ९.८ टक्के राहिला. अमेरिकी फेडरल रिझर्व्ह बँकेकडून पुढील आठवड्यात व्याजदरात वाढ होऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे. या पार्श्वभूमीवर विदेशी गुंतवणूकदार जमा ठेवी काढून त्या अमेरिकेत बाँड बाजारात गुंतवणूक करू शकतात. डॉलरच्या तुलनेत सकाळी रुपया ६६.८० वर होता. दिवसभराच्या चढ-उतारानंतर तो ६६.८८ प्रति डॉलरवर बंद झाला. अमेरिकेत व्याजदर वाढण्याच्या शक्यतेने जागतिक बाजारपेठेत मोठे चढ-उतार होत आहेत.
रुपया पोहोचला दोन वर्षांच्या नीचांकावर
By admin | Updated: December 12, 2015 00:01 IST