Join us

निर्यात वाढविण्यासाठी रुपया घसरू द्यायला हवा

By admin | Updated: January 18, 2016 00:25 IST

रुपयातील घसरणीचे उद्योग मंडळ असोचेमने स्वागत केले असून ही घसरण अशीच सुरू राहू द्यावी, असे म्हटले. निर्यात स्पर्धात्मक राहण्यासाठी रुपयाची किंमत कमी

नवी दिल्ली : रुपयातील घसरणीचे उद्योग मंडळ असोचेमने स्वागत केले असून ही घसरण अशीच सुरू राहू द्यावी, असे म्हटले. निर्यात स्पर्धात्मक राहण्यासाठी रुपयाची किंमत कमी कमी होऊ दिली पाहिजे, असे असोचेमने म्हटले.जागतिक बाजारपेठेत चीनच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या आदळआपटीच्या पार्श्वभूमीवर रुपयाच्या किमतीत होत असलेली घसरण ही स्वागतार्ह आहे. रुपयाच्या किमतीत सुधारणा होईल तेव्हा भारताच्या निर्यातीवर चीन आणि इतर उभरत्या देशांमुळे प्रतिकूल परिणाम होईल. रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने तिच्याकडील विशाल परकीय गंगाजळीचा वापर आपल्या चलनाची अवस्था खूपच वाईट झाल्यावर त्याच्या संरक्षणासाठी केला पाहिजे.शेअर्सच्या किमतीत भरपूर घट झाल्यानंतरही बाजारातून विदेशी गुंतवणूक काढून घेण्याचे प्रमाण कायम राहिल्याच्या पार्श्वभूमीवर आयातदारांकडून डॉलरची मागणी वाढली. त्यावेळी रुपयाचा भाव शुक्रवारी ३० पैशांनी घटून डॉलरला ६७.५९ झाला. गेल्या २८ महिन्यांच्या किमान स्तरावर हा भाव पोहोचला होता. भारतीय अर्थव्यवस्थेची गाडी सध्या अनेक आघाड्यांवर अडकल्याचे दिसते. भारताच्या कारखाना उत्पादानात घट झाली आहे. महागाईचे प्रमाण वाढत आहे. शेअर बाजारात घसरण होत आहे.