Join us

डॉलरच्या तुलनेत रुपया २९ महिन्यांच्या नीचांकावर

By admin | Updated: January 22, 2016 03:11 IST

जागतिक आर्थिक परिस्थितीमुळे डॉलरच्या तुलनेत रुपया ७ पैशांनी घसरून ६८ वर बंद झाला. हा २९ महिन्यातील नीचांकी स्तर आहे

मुंबई : जागतिक आर्थिक परिस्थितीमुळे डॉलरच्या तुलनेत रुपया ७ पैशांनी घसरून ६८ वर बंद झाला. हा २९ महिन्यातील नीचांकी स्तर आहे. शेअरचे भाव कोसळल्यामुळे बँका व आयातकांकडून अमेरिकन डॉलरला मागणी कायम होती. आंतर बँक परकीय चलन विनिमय बाजारात बुधवारी ६७.९५ वर बंद झालेला रुपया ६७.८८ असा झाला. नंतर ६८.११ वर खाली येत ७ पैशाचे नुकसान सहन करीत ६८.०२ असा बंद झाला. यापूर्वी २८ आॅगस्ट २०१३ रोजी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर ६८.८० असा होता. गेल्या दोन दिवसात रुपया ३७ पैसे म्हणजेच ०.५५ टक्के घसरला आहे. गुरुवारी दिवसभर रुपया ६८.११ व ६७.८१ दरम्यान राहिला. एशियन बाजारातील सहा चलनांमध्ये डॉलर इंडेक्स ०.०२ टक्क्यांनी घसरला.