मुंबई : भारतीय रुपया गुरुवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आणखी घसरला. २० महिन्यांतील नीचांक गाठत रुपयाचे मूल्य ६४.२३ वर आले. बँका आणि आयातदारांकडून सातत्याने डॉलरची मागणी केल्याने आणि विदेशी गुंतवणूकदारांनी हात आखडता घेत गुंतवणूक काढण्यावर भर दिल्याने रुपयावर दबाव वाढला. याशिवाय मॅटसंबंधीची चिंता आणि इतर कर सुधारणा विधेयके संसदेत रखडल्याचा हा परिणाम असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.आंतरबँक विदेशी चलन विनिमय बाजारात आज सुरुवातीपासून रुपया डॉलरच्या मुकाबल्यात ६३.७८ वर होता. नंतर यात घसरण होत गेली. दिवसअखेर डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ६४.२३ रुपयांवर घसरले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढल्याचाही रुपयावर परिणाम झाला. बुधवारी रुपयाचे मूल्य ६३.५३ रुपये (प्रति डॉलर) होते.
रुपयाचा वीस महिन्यांचा नीचांक
By admin | Updated: May 8, 2015 01:01 IST