Join us
Daily Top 2Weekly Top 5

रुपया २२ पैशांनी खाली आला

By admin | Updated: August 13, 2015 22:05 IST

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाने आधीची मिळविलेली वाढ त्याला गुरुवारी टिकवता आली नाही व बँका व आयातदारांकडून डॉलरला मागणी

मुंबई : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाने आधीची मिळविलेली वाढ त्याला गुरुवारी टिकवता आली नाही व बँका व आयातदारांकडून डॉलरला मागणी वाढताच तो २२ पैशांनी स्वस्त होऊन एक डॉलर ६५ रुपयांवर गेला.बुधवारी बाजार बंद होता तेव्हा आंतर बँक व्यवहारात डॉलरचा भाव ६४.७८ रुपये होता. त्यावर गुरुवारी सकाळी व्यवहार सुरू होताच निर्यातदारांनी शेअर बाजारात तेजी येताच डॉलर विकायला सुरुवात करताच त्याचा भाव ६४.७२ रुपये झाला व नंतर तो ६४.६३ रुपयांवर स्थिरावला; परंतु सुरुवातीची वाढ रुपयाला राखता आली नाही. आयातदार आणि बँकांकडून डॉलरला मागणी वाढताच तो २० पैशांनी स्वस्त होऊन ६५ रुपये झाला.