Join us

रुपी बँकेचा कारभार ४ सदस्यीय मंडळाकडे

By admin | Updated: January 31, 2015 02:19 IST

रुपी बँकेच्या प्रशासकांच्या मदतीला ३ तज्ज्ञ व्यक्तींचे सल्लागार मंडळ नेमण्याचे आदेश सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी काढले आहेत.

पुणे : रुपी बँकेच्या प्रशासकांच्या मदतीला ३ तज्ज्ञ व्यक्तींचे सल्लागार मंडळ नेमण्याचे आदेश सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी काढले आहेत. नॅशनल फेडरेशन फॉर को-आॅपरेटिव्ह अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. मुकुंद अभ्यंकर, जनता सहकारी बँकेचे प्रमुख अरविंद खळदकर, चार्र्टर्ड अकाऊंटंट सुधीर पंडित या तज्ज्ञांच्या मंडळाची निवड करण्यात आली आहे.रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने आर्थिक निर्बंध घातल्यानंतर सहकार विभागाने त्यावर द्विसदस्यीय प्रशासक मंडळ नेमले होते. त्याच्या अध्यक्षपदी डॉ. संजय भोसले व सदस्य म्हणून बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात अनास्कर यांनी सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. त्या नंतर डॉ. भोसले हेच रुपीचे काम पाहत होते. सहकार आयुक्तांनी तिघांच्या नियुक्तीचे पत्र रुपी बँकेला पाठविले आहे. (प्रतिनिधी)