Join us  

रुपी बँक टीजेएसबीकडे हस्तांतरित होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 2:38 AM

रुपी को ऑपरेटिव्ह बँकेची देणी व मालमत्ता घेण्याची तयारी ठाणे जनता सहकारी बँकेने (टीजेएसबी) दर्शविली आहे.

पुणे : रुपी को ऑपरेटिव्ह बँकेची देणी व मालमत्ता घेण्याची तयारी ठाणे जनता सहकारी बँकेने (टीजेएसबी) दर्शविली आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाची (आरबीआय) मान्यता आवश्यक आहे. या मान्यतेसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन सहकार आयुक्त सतीश सोनी यांनी रुपी व टीजेएसबी बँकेच्या संयुक्त बैठकीत दिले. या विलिनीकरणाऐवजी ठेव विमा महामंडळ योजनेच्या सहाय्याने रुपी बँकेच्या मालमत्ता व दायित्व हस्तांतरणाचा सुधारित प्रस्ताव रुपी बँकेने सहकार आयुक्तांकडे सादर केला. विलिनीकरणामुळे टीजेएसबी बँकेस कोणतेही आार्थिक नुकसान होणार नाही. यावर चर्चेसाठी सहकार आयुक्तांनी १६ जानेवारीला रुपी व टीजेएसबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुंबईत बैठक बोलावली होती.