मुंबई : बँका आणि आयातदारांकडून मागणी वाढल्यामुळे भारतीय रुपया सलग चौथ्या दिवशी घसरून डॉलरच्या तुलनेत २१ महिन्यांच्या नीचांकावर गेला. आज रुपयात १0 पैशांची घसरण झाली. त्याबरोबर १ डॉलरची किंमत ६४.२६ रुपये झाली. ६ सप्टेंबर २0१३ रोजी १ डॉलरची किंमत ६५.२४ रुपये होती. त्यानंतरची सर्वाधिक नीचांकी पातळी म्हणून आजच्या दराची नोंद झाली. गेल्या ४ दिवसांत रुपयाने ४२ पैसे गमावले आहेत.
२१ महिन्यांच्या नीचांकावर रुपया
By admin | Updated: June 17, 2015 03:30 IST