Join us

आयसीआयसीआयला ५८.९ कोटींचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 05:21 IST

सरकारी रोख्यांच्या विक्रीविषयक नियमांची पायमल्ली केल्याच्या आरोपावरून आयसीआयसीआय बँकेला रिझर्व्ह बँकेने ५८.९

मुंबई : सरकारी रोख्यांच्या विक्रीविषयक नियमांची पायमल्ली केल्याच्या आरोपावरून आयसीआयसीआय बँकेला रिझर्व्ह बँकेने ५८.९ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेने एखाद्या व्यावसायिक बँकेला एकाच प्रकरणात ठोठावलेला हा सर्वांत मोठा दंड ठरला.रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेत ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, रिझर्व्ह बँकेने २६ मार्च रोजी दंडाचा आदेश जारी केला आहे.एचटीएम (हेल्ड-टू-मॅच्युरिटी) पोर्टफोलिओमधील रोख्यांच्या विक्रीसाठी रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा आयसीआयसीआयने भंग केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, बँकिंग नियमन कायदा १९४९ अन्वये हा दंड ठोठाविण्यात आला. मात्र यामुळे कोणतेही व्यवहार अथवा करारांना वैधता मात्र प्राप्त होत नाही.