मुंबई : आयपीओ बाजारातील दुष्काळ संपल्याचे चिन्ह दिसू लागले असून २०१५ मध्ये आतापर्यंत २१ कंपन्या यात उतरल्या आहेत. आयपीओअंतर्गत त्यांनी १३,६०० कोटी रुपये उभारले आहेत. हा पाच वर्षांतील उच्चांक आहे.
नव्या वर्षासाठी हे सकारात्मक सूचक मानले जात आहे. लवकरच १४,००० कोटी रुपयांचे आयपीओ बाजारात येणार आहेत.
विशेषज्ञांचे म्हणणे आहे की, एकूण ५०,००० कोटी रुपयांचे आयपीओ बाजारात येण्याची शक्यता आहे.
यावर्षी अक्षय ऊर्जा, क्यूएसआर, लॉजिस्टिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि एअरलाइन्स क्षेत्रातील कंपन्यांनी आयपीओ बाजारात उतरविले आहेत. २०१५ मध्ये २१ आयपीओअंतर्गत जमा झालेली रक्कम २०१० नंतरची सर्वाधिक रक्कम आहे. त्या वर्षी आयपीओअंतर्गत ३७,५३४ कोटी रुपये जमा झाले होते.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}