नवी दिल्ली : मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४८१ अंकांनी वाढून २५,६२६.७५ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सचा हा साडेतीन महिन्यांचा उच्चांक आहे. बाजाराचा हा आठवडा बुधवारीच संपला. या आठवड्यात सेन्सेक्सने घसघशीत ९५२.९१ अंकांनी, तर निफ्टीने २९५.२५ अंकांनी वाढ मिळविली आहे. ४८१.१६ अंकांची अथवा १.९१ टक्क्यांची वाढ मिळवून तो २५,६२६.७५ अंकांवर बंद झाला. निफ्टी १४१.५0 अंंकांनी अथवा १.८४ टक्क्यांनी वाढून ७,८५0.४५ अंकांवर बंद झाला.
सेन्सेक्सची झेप
By admin | Updated: April 14, 2016 01:15 IST