Join us

बारावीची वस्त्रशास्त्र विषयाची फेरपरीक्षा १ एप्रिलला

By admin | Updated: March 25, 2015 21:10 IST

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या वस्त्रशास्त्र (टेक्सटाईल्स) विषयाच्या परीक्षेस राज्यातील काही विद्यार्थी अनुपस्थित राहिले. परंतु, या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मंडळाने १ एप्रिल रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत ही परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

शिक्षण मंडाळाचे छापिल वेळापत्रक न पाहता संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रक पाहिले. परिणामी ७ मार्च रोजी सकाळी ११ ते २ या कालावधीत वस्त्रशास्त्र या विषयाची परीक्षा देण्यासाठी न जाता काही विद्यार्थी दुपारच्या सत्रात परीक्षा केंद्रावर गेले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. त्यामुळे विद्यार्थीहित लक्षात घेऊन मंडळाने फेरपरीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.