जकात नाका केंद्रात ३९ अपक्षांची माघार
By admin | Updated: April 10, 2015 23:29 IST
११ वॉर्ड : ७८ उमेदवार निवडणूक रिंगणात
जकात नाका केंद्रात ३९ अपक्षांची माघार
११ वॉर्ड : ७८ उमेदवार निवडणूक रिंगणात औरंगाबाद : मध्यवर्ती जकात नाका निवडणूक केंद्रांतर्गत येणार्या ११ वॉर्डांतील ३९ अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत दिली होती. राष्ट्रीय पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी अपक्षांचे मनपरिवर्तन करीत त्यांना अर्ज मागे घ्यायला लावला. शहाबाजार वॉर्डात २ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता ५ उमेदवार येथे निवडणूक लढविणार आहेत. कैसर कॉलनी वॉर्डात ४ जणांनी अर्ज मागे घेतले. तेथे ९ उमेदवार रिंगणात आहेत. नवाबपुरा वॉर्डात ४ अपक्षांनी माघार घेतली. येथे १२ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. बारी कॉलनी वॉर्डात ४ जणांनी मागे पाऊल टाकल्याने आता ४ उमेदवार निवडणूक लढवतील. इंदिरानगर-उत्तर या वॉर्डात ४ अपक्षांनी मैदान सोडले असून, आता ८ जण शिल्लक राहिले आहेत. अल्तमश कॉलनी वॉर्डात ३ उमेदवारांमध्ये निवडणूक होणार आहे. सिडको एन-६ वॉर्डात ८ अपक्षांनी माघार घेतल्याने आता ८ उमेदवार नशीब अजमावणार आहेत. आविष्कार कॉलनी वॉर्डात ६ अपक्षांनी अर्ज मागे घेतला असून, ६ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. गुलमोहर कॉलनीत ४ जणांनी मैदानातून पळ काढल्यामुळे आता १० उमेदवारांत नगरसेवकपदासाठी लढाई होणार आहे. उल्लेखनीय म्हणजे राजाबाजार वॉर्डात एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. येथे ५ उमेदवार निवडणूक लढवतील. संजयनगर-खासगेट वॉर्डातही एकाही उमेदवाराने माघार न घेतल्याने येथे ८ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत.