Join us
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ महागाईचा दर ५.३७ टक्के

By admin | Updated: March 13, 2015 00:24 IST

भाजीपाल्यांसह खाद्यवस्तू आणि पेयपदार्थ महागल्याने फेब्रुवारी महिन्यात किरकोळ महागाईचा दर ५.३७ टक्क्यांवर पोहोचला.

नवी दिल्ली : भाजीपाल्यांसह खाद्यवस्तू आणि पेयपदार्थ महागल्याने फेब्रुवारी महिन्यात किरकोळ महागाईचा दर ५.३७ टक्क्यांवर पोहोचला. फेब्रुवारीसाठी ग्राहक मूल्यांक निर्देशांक आधारित किरकोळ महागाईचे मोजमाप २०१२ या नवीन आधार वर्षानुसार करण्यात आले आहे. सुधारित दरानुसार जानेवारीत किरकोळ महागाईचा दर ५.१९ टक्के असल्याचेही घोषित करण्यात आले आहे. मागच्या वर्षी फेब्रुवारीत ग्राहक मूल्यांक निर्देशांक ७.८८ टक्के होता.फेब्रुवारी २०१५ मध्ये खाद्यवस्तू ६.७९ टक्क्यांनी महागल्या. भाजीपाला डाळी आणि पेयपदार्थांचे भाव भडकल्याने फेब्रुवारीत महागाईचा तोरा वाढला आहे. फेब्रुवारीत भाजीपाला १३ टक्क्यांनी महागला. डाळीसाळीही १० टक्क्यांनी महागल्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)