Join us  

Retail inflation: महंगाई डायन...! कोरोना संकटात महागाईचा वार, गाठला गेल्या ६ महिन्यातील उच्चांक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 8:16 PM

Retail inflation in May: कोरोनाच्या संकटाला संपूर्ण देश सामोरं जात असतानाच महागाईच्या वाढत्या दरानंही सर्वसामान्यांचं जगणं कठीण केलं आहे.

Retail inflation in May: कोरोनाच्या संकटाला संपूर्ण देश सामोरं जात असतानाच महागाईच्या वाढत्या दरानंही सर्वसामान्यांचं जगणं कठीण केलं आहे. कारण किरकोळ महागाईच्या दरानं गेल्या सहा महिन्यातील उच्चांक गाढला आहे. मे महिन्यातील ग्राहक निर्देशंकात वाढ होऊन महागाईचा दर ६.३० टक्क्यांवर पोहोचला आहे. 

रिझर्व्ह बँकेनं किरकोळ महागाईचं लक्ष्य ४ टक्के इतकं ठेवलं होतं. यात महागाईचा दर सर्वाधिक ६ टक्के आणि कमीतकमी २ टक्क्यांपर्यंत ठेवण्याचं लक्ष्य आरबीआयचं होतं. पण महागाईचा हा दर आता भारतीय रिझर्व्ह बँकेच्याही आवाक्याबाहेर गेला आहे. 

विशेष म्हणजे एप्रिल महिन्यात महागाईचा दर ४.२३ टक्के इतका होता. पण मे महिन्यात अन्नधान्याचा महागाईचा दर (Food Inflation) ५.०१ टक्क्यांवर पोहोचला. एप्रिल महिन्यात हाच दर फक्त १.९६ टक्के इतका होता. किरकोळ महागाईचा दर अतिशय महत्वाचा असतो कारण याच दराच्या आधारावर भारतीय रिझर्व्ह बँक पतधोरण जाहीर करत असते. गेल्या आठवड्यातच आरबीआयची महत्वपूर्ण बैठक झाली. यात आरबीआयनं सलग सातव्यांदा रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नाही. सध्या रेपो रेट ४ टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्के आहे. 

टॅग्स :महागाईभारतीय रिझर्व्ह बँकव्यवसाय