Join us

‘गुंतवणूक थांबल्यास रोजगारावर परिणाम’

By admin | Updated: July 20, 2015 23:08 IST

प्रस्तावित कामगार कायद्यांतील बदलांना कामगार संघटनांनी विरोध केला तर गुंतवणुकीचा प्रवाह थांबून रोजगार निर्मिती अडचणींत येईल,

नवी दिल्ली : प्रस्तावित कामगार कायद्यांतील बदलांना कामगार संघटनांनी विरोध केला तर गुंतवणुकीचा प्रवाह थांबून रोजगार निर्मिती अडचणींत येईल, असा स्पष्ट इशारा अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिला. आर्थिक उपक्रमांवर परिणाम होईल अशा कोणत्याही विचारांना थारा देऊ नका, असेही ते म्हणाले.जेटली सोमवारी येथे ४६ व्या भारतीय श्रम संमेलनात बोलत होते. जेटली म्हणाले,‘‘आर्थिक उपक्रम वाढल्याशिवाय कामगारांना खात्रीने संरक्षण मिळू शकत नाही. सरकार कामगार कायद्यांमध्ये जे बदल करू इच्छिते त्यासंदर्भात निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी झालेली जेटली अध्यक्ष असलेल्या मंत्रिमंडळ समितीची व कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक अपयशी ठरली.जेटली म्हणाले जर आम्ही गुंतवणूक थांबविली तर रोजगार निर्माण होणार नाहीत पर्यायाने आर्थिक उपक्रमही होणार नाहीत व याचा परिणाम सध्याच्या रोजगारावरही होईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)