Join us

पेटीएमला देशभर प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2016 02:52 IST

भारतातील सर्वात मोठा मोबाइल पेमेंट व कॉमर्स प्लॅटफॉर्म असलेल्या पेटीएमची डिजिटल पेमेंट पद्धत मुंबईत चांगलीच रुळली असून,

मुंबई : भारतातील सर्वात मोठा मोबाइल पेमेंट व कॉमर्स प्लॅटफॉर्म असलेल्या पेटीएमची डिजिटल पेमेंट पद्धत मुंबईत चांगलीच रुळली असून, आता पेटीएम मोबाइल वॉलेटने दोन लाख व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे ठरवले आहे. सर्व आर्थिक व्यवहारांसाठी पेटीएम हा सुरक्षित प्लॅटफॉर्म असून, रिझर्व्ह बँकेचा परवाना असलेला हे सेमी क्लोज्ड प्रीपेड इन्स्ट्रुमेंट आहे. त्यामुळे डिजिटल स्वरूपात पैसे साठवणे व क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वा नेट बँकिंग यांच्याऐवजी आर्थिक व्यवहार करणे सहज शक्य होते.