Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिझव्र्ह बँकेचा कजर्माफी योजनांना विरोध

By admin | Updated: November 13, 2014 23:33 IST

भारतीय रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी सूक्ष्म वित्तीय संस्थांना कर्जावर माफक दराने व्याज आकारण्याची सूचनाही केली आहे.

मुंबई : राज्य सरकारच्या  कजर्माफी योजनांमुळे  पत बाजार विस्कळीत होतो, असे स्पष्ट करून भारतीय रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी सूक्ष्म वित्तीय संस्थांना कर्जावर माफक दराने व्याज आकारण्याची सूचनाही केली आहे.
नाबार्डच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी व्याजदराचे योग्य प्रमाण निश्चित करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मागच्या वर्षी फैलिन वादळाच्या तडाख्यानंतर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा सरकारने शेतक:यांसाठी कजर्माफीची घोषणा केली होती. तेलंगणा सरकारने माफ करण्यात आलेल्या  कर्जापैकी 25 टक्के बँकांना दिले होते; परंतु आंध्र प्रदेश सरकारने अद्याप असे केलेले नाही. या दोन राज्यांत बँकांनी कृषी क्षेत्रसाठी 1.3 लाख कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे.