Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिझर्व्ह बँकेचे व्याजदर कायम राहण्याची शक्यता

By admin | Updated: November 30, 2015 00:49 IST

रिझर्व्ह बँकेची मौद्रिक नीती आढाव्याची बैठक येत्या मंगळवारी होत असून तीत सध्याचे व्याजदर कायम राहू शकतील. चलनवाढीच्या मुद्याकडे फेडरल रिझर्व्ह बँकेच्या बैठकीआधी

मुंबई : रिझर्व्ह बँकेची मौद्रिक नीती आढाव्याची बैठक येत्या मंगळवारी होत असून तीत सध्याचे व्याजदर कायम राहू शकतील. चलनवाढीच्या मुद्याकडे फेडरल रिझर्व्ह बँकेच्या बैठकीआधी ‘थांबा आणि वाट पाहा’ धोरण अवलंबिले जाऊ शकते. याआधीच्या धोरण आढाव्याच्या बैठकीत रिझर्व्ह बँकेने व्याजदरात ०.५० टक्के कपात केली होती. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन पाचवा द्वैमासिक मौद्रिक नीती आढावा एक डिसेंबर रोजी घेतील.युको बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आर.के. टक्कर म्हणाले की, ‘‘राजन फेडरल रिझर्व्ह काय पाऊल उचलते याच्या प्रतीक्षेत असावेत. ते व्याजदरात बदल करणार नाहीत.’’ युनायटेड बँकेचे कार्यकारी संचालक संजय आर्य यांनी मंगळवारच्या बैठकीत आहे ती स्थिती राहील असे वाटते, असे सांगितले.