Join us  

महागाईच्या चिंतेमुळे रिझर्व्ह बँकेने सलग दुसऱ्यांदा वाढविला व्याजदर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2018 1:13 AM

महागाईची प्रचंड चिंता असल्याने बँकेने सलग दुस-यांदा रेपो दरात (बँकांना दिल्या जाणा-या कर्जावरील व्याज दर) पाव टक्का वाढ केली. सलग दोन द्वैमासिक पतधोरणात दर वाढ करण्याचा हा निर्णय बँकेने आॅक्टोबर २०१३ नंतर पहिल्यांदाच घेतला आहे.

- चिन्मय काळेमुंबई : महागाईची प्रचंड चिंता असल्याने बँकेने सलग दुस-यांदा रेपो दरात (बँकांना दिल्या जाणा-या कर्जावरील व्याज दर) पाव टक्का वाढ केली. सलग दोन द्वैमासिक पतधोरणात दर वाढ करण्याचा हा निर्णय बँकेने आॅक्टोबर २०१३ नंतर पहिल्यांदाच घेतला आहे.खरिप पीक बाजारात आल्यावर त्याला दीडपट हमीभाव देण्यात येणार असल्याने आणि इंधनाचे वाढते भाव यांमुळे महागाई अपेक्षेहून अधिक वाढेल, अशी भीती आहे. जून महिन्यातही रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पाव टक्का वाढ केली होती. त्यावेळी महागाई दर ४.५० टक्क्यांच्याजवळ राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. पण प्रत्यक्षात महागाई दर ५ टक्क्यांवर गेला. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने यंदा पुन्हा उद्योग क्षेत्राची तमा न बाळगता बुधवारी रेपो दरात पाव टक्क्यांची वाढ केली.‘तटस्थ भूमिका’ शेअर बाजाराच्या पथ्यावररिझर्व्ह बँक पतोधरण जाहीर करताना प्रामुख्याने तीन प्रकारच्या भूमिका मांडते. ‘हॉकिश’ अर्थात कठोर, ‘कॉशिअस’ अर्थात दक्ष आणि ‘न्युट्रल’ अर्थात तटस्थ यांचा त्यात समावेश आहे. महागाई खूप वाढल्यास रिझर्व्ह बँक ‘कठोर’ भूमिकेद्वारे अर्थव्यव्थेवर निर्बंध आणते.बुधवारीसुद्धा रेपो दरात वाढीसह बँक ‘कठोर’ भूमिका घेईल, असा अंदाज होता. त्यामुळेच सकाळपासून बाजारात चढ-उतार होता. दरवाढीची घोषणा होताच घसरण सुरू झाली. पण त्यानंतर बँकेने ‘तटस्थ’ भूमिका जाहीर केल्यामुळे बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते.तरीही दिवसअखेर सेन्सेक्स ८४ अंकांच्या घसरणीसह ३७,५२१ वर बंद झाला. ‘तटस्थ’ भूमिकेमुळे बँक पुढील पतधोरणात व्याज दरात कपात करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.दीडपट हमीभावामुळे येत्या काळात धान्य दर वाढणार आहेत, तसेच आंतरराष्टÑीय स्तरावर खनिज तेलाच्या दरांची स्थिती अनाकलनीय आहे. हे पाहता महागाई दर येत्या वर्षभरात ६ टक्क्यांपर्यंतही वाढण्याची भीती बँकांना वाटत आहे. यामुळेच बाजारात येणारा अतिरिक्त पैसा रोखण्यासाठी रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.चलन युद्धाची सुरुवातआर्थिक पातळीवर काही महिन्यांपासून गोंधळाची स्थिती आहे. आपणही त्याच्या जवळ आहोत. चलन युद्ध भारतीय अर्थव्यवस्थेच्या दारात आहे.- ऊर्जित पटेल,गव्हर्नर, रिझर्व्ह बँकहमीभावाच्या परिणामांचा अंदाजहमीभावातील वाढीच्या परिणामांचा अंदाज लावणे सध्या आव्हानात्मक ठरेल. पण या निर्णयामुळे खरिपाच्या पीकांना मागील काही वर्षातील सर्वाधिक दर मिळेल. त्याचा थेट परिणाम खाद्यान्नांवर होईल, हे नक्की.- डॉ. विरल आचार्य,डेप्युटी गर्व्हनर, रिझर्व्ह बँक

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँक