Join us

रिझर्व्ह बँकेकडे ५५७.७५ टन सोने

By admin | Updated: January 26, 2015 03:54 IST

भारतीय रिझर्व्ह बँकेकडे डिसेंबर २०१४ च्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत ५५७.७५ टन सोन्याचा साठा होता आणि त्यावेळी त्याचा बाजारभाव १,१७६.६ अब्ज रुपये एवढा होता

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडे डिसेंबर २०१४ च्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत ५५७.७५ टन सोन्याचा साठा होता आणि त्यावेळी त्याचा बाजारभाव १,१७६.६ अब्ज रुपये एवढा होता. माहिती अधिकार कायद्यांतर्गत यासंदर्भात अर्ज करण्यात आला होता.आरटीआय अर्जाद्वारे प्राप्त माहितीनुसार, देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे १९ डिसेंबर २०१४ रोजी ५५७.७५ टन सोने होते. यापैकी २६५.४९ टन सोन्याचा साठा विदेशात बँक आॅफ इंग्लंड व आंतरराष्ट्रीय निपटारा बँकेच्या तिजोरीत ठेवण्यात आला आहे.