Join us

छोट्या व्यावसायिकांना घरगुती दराने वीज पुरवा शाहूवाडीत उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना निवेदन

By admin | Updated: November 21, 2014 22:38 IST

मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील छोट्या व्यावसायिकांना घरगुती पद्धतीने वीजदर आकारणी करावी, या मागणीचे निवेदन शाहूवाडी तालुका किरकोळ असोसिएशन यांच्यावतीने वीज वितरण कंपनीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने छोट्या व्यावसायिकांना घरगुती पद्धतीने वीज आकारणी करावी, असा आदेश दिला आहे. मात्र, वीज वितरण कंपनीने हा आदेश धाब्यावर बसविला आहे. त्यामुळे शेकापचे भाई भारत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज, शुक्रवारी वीज वितरण कंपनीला आपल्या न्याय मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मागण्यांचे निवेदन कार्यालयाला पाठविण्यात येत असल्याचे दीपक पाटील यांनी सांगितले.
निवेदनावर शेकापचे भारत पाटील, मधुकर हेरले, राजू देशमाने, राजाराम मगदूम, कृष्णात लाड, गोपाळ पाटील, अनिल कांबळे, तुकाराम पाटील, सुदाम कांबळे, शिवाजी पाटील, आदींच्या स‘ा आहेत.