Join us

रिलायन्स पुढील तीन वर्षात करणार १.८ लाख कोटींची गुंतवणूक

By admin | Updated: June 18, 2014 13:22 IST

मुकेश अंबानी यांचा रिलायन्स समूह पुढील तीन वर्षात विविध क्षेत्रांमध्ये १ लाख ८० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी दिली आहे.

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. १८- मुकेश अंबानी यांचा रिलायन्स समूह पुढील तीन वर्षात विविध क्षेत्रांमध्ये १ लाख ८० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी दिली आहे. देशातील बहुप्रतिक्षित 4G सेवा ऑगस्टपासून प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाणार असून २०१५ पर्यंत ही सेवा देशभरात सुरु करण्याची महत्त्वपूर्ण घोषणाही त्यांनी केली आहे. 
रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबांनी यांनी बुधवारी कंपनीच्या भागीदारांची वार्षिक सर्वसाधारण बैठक घेतली. यात अंबानींनी कंपनीच्या पुढील वाटचालीची माहिती मांडली. रिलायन्स समूह पुढील तीन वर्षात विविध क्षेत्रांमध्ये १ लाख ८० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करेल असे अंबानीनी सांगितले. पेट्रोकेमिकल, उर्जा, रिटेल आणि टेलिकॉम या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणात केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. 
मोबाईल युझर्सना वेगवान सुविधा देणा-या 4G सेवेचा परवाना मुकेश अंबानीं यांच्या रिलायन्स समुहाकडे असून ही सेवा कधी सुरु होईल याविषयी सर्वसामान्यांनाही उत्सुकता लागली आहे. या सेवेविषयी माहिती देताना अंबानी म्हणाले, ऑगस्टमध्ये देशातील काही मोठ्या शहरांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा राबवली जाणार आहे. त्यानंतर २०१५ मध्ये या सेवेचा शुभारंभ होईल.