Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिलायन्समध्ये मिळणार २६ आठवड्यांची मातृत्वरजा

By admin | Updated: April 18, 2017 01:08 IST

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिज या देशातील सर्वात मोठ्या खासगी कंपनीने संसदेने अलीकडेच संमत केलेला मातृत्वरजेसंबंधीचा सुधारित कायदा लागू केला

नवी दिल्ली : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिज या देशातील सर्वात मोठ्या खासगी कंपनीने संसदेने अलीकडेच संमत केलेला मातृत्वरजेसंबंधीचा सुधारित कायदा लागू केला असून, त्यानुसार आता त्यांच्या महिला कर्मचाऱ्यांना २६ आठवड्यांची मातृत्वरजा मिळणार आहे. कंपनीच्या एचआर विभागाने कर्मचाऱ्यांना उद्देशून प्रसिद्ध केलेल्या नोटिशीत म्हटले की, १ एप्रिल २०१७ पासून कंपनीच्या नियमित कर्मचाऱ्यांची मातृत्वरजा १८० दिवसांवरून २६ आठवडे (१८२ कॅलेंडर दिवस) अशी वाढविण्यात आली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)