Join us

रिलायन्स जिओ आता ‘ओपन नेटवर्क’मध्येही

By admin | Updated: April 6, 2017 00:25 IST

जगभरातील बड्या कंपन्यांचा समावेश असलेल्या ओपन नेटवर्क आॅटोमेशन (ओएनएपी) प्रकल्पामध्येही सहभागी झाली आहे.

सँटा क्लारा : देशात फोरजी मोबाइल डाटा सेवा देणारी सर्वांत मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स जिओ आता जगभरातील बड्या कंपन्यांचा समावेश असलेल्या ओपन नेटवर्क आॅटोमेशन (ओएनएपी) प्रकल्पामध्येही सहभागी झाली आहे. अमेरिकेत झालेल्या ओपन नेटवर्किंग परिषदेत जिओच्या या प्रकल्पातील प्लॅटिनम सदस्यत्वाची घोषणा करण्यात आली. ओपन नेटवर्किंगसाठी आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिकेतील सेवादाता कंपन्या ओएनएपीच्या माध्यमातून एकत्र आल्या आहेत. दूरसंचार क्षेत्रात सॉफ्टवेअर नेटवर्किंग आणि इतर संशोधनांसाठी या नवीन प्रकल्पाचा उपयोग होणार आहे. हा प्रकल्प द लिनक्स फाउंडेशनने फेब्रुवारीत सुरू केला होता. या प्रकल्पात चायना मोबाइल, बेल कॅनडा, अ‍ॅट अ‍ॅण्ड टी, सिस्को, इरिक्सन अशा बड्या कंपन्यांचा सहभाग आहे.