ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. 14 - रिलायन्स जिओ गुगलच्या मदतीनं सर्वात स्वस्त 4जी स्मार्ट फोन तयार करत असल्याची माहिती एका रिपोर्टमधून समोर आली आहे. या स्मार्ट फोनवर फक्त जिओचं 4जी नेटवर्क चालणार आहे. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात हा स्वस्त स्मार्ट फोन रिलायन्स जिओ लाँच करण्याची शक्यता आहे, अशी माहिती बिझनेस लाइनच्या रिपोर्टमधून उघड झाली आहे. स्मार्टफोनशिवाय गुगल आणि रिलायन्स जिओ मिळून स्मार्ट टीव्ही सर्व्हिससाठी सॉफ्टवेअरही डेव्हलप करत असून, हे सॉफ्टवेअर जिओच्या वापरकर्त्यांनाही वापरता येणार आहे. यंदाच्या वर्षी जिओचं स्मार्ट टीव्ही सर्व्हिस दुस-या भागामध्ये लाँच करण्यात येऊ शकते. रिपोर्टनुसार, गुगलच्या ब्रँडमुळे रिलायन्स जिओला 4जी हँडसेट मोठ्या प्रमाणात बाजारात विकण्यासाठी मदत मिळणार आहे. गुगलसोबत रिलायन्स जिओनं काम केल्यास जिओ स्वतःच्या अॅप्सला अँड्रॉइड प्लॅटफॉर्मसाठी सोयीस्कर बनवू शकते. सध्या रिलायन्स रिटेल चीनच्या काही कंपन्यांसोबत मिळून 4G VoLTE स्मार्टफोन्स आणि पॉकिट राऊटर्स तयार करत आहे. (रिलायन्स जिओ नेटवर्कमध्येही नंबर 1)(रिलायन्स जिओचा 1500 रुपयांचा जबरदस्त फोन लवकरच होणार लाँच)या कंपन्यांमध्ये फॉक्सकॉन, ZTE, CK टेलिकॉम, विंगटेक आणि टीनो मोबाइलचा समावेश आहे. रिलायन्स इंडस्ट्रीनं गेल्या काही दिवसांपूर्वी चीनच्या तायवानच्या पार्टनर कंपन्यांना Lyf ब्रँडचे स्मार्टफोन्स आणि स्मार्ट सेट टॉप बॉक्स भारतात बनवण्याचा सल्ला दिला होता. रिलायन्स जिओ लावा आणि चीनच्या काही कंपन्यांसोबत मिळून 4G VoLTE फीचर फोन्स बनवणार असल्याचं वृत्त इकोनॉमिक्स टाइम्सने दिलं आहे. जो स्मार्टफोन सर्वात स्वस्त असून, त्याची किंमत 1000 रुपये एवढी असणार आहे.
रिलायन्स जिओ आणि गुगल आले एकत्र, बनवणार स्वस्त 4जी फोन
By admin | Updated: March 14, 2017 18:09 IST