Join us  

रिलायन्सचे बाजारमूल्य १५० अब्ज डॉलरवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 4:15 AM

बीएसईमध्ये रिलायन्सचा समभाग २.५३ टक्क्यांनी वाढून १,८०४ रुपयांवर गेला. एनएसईमध्येही तो २.५४ टक्क्यांनी वाढून सार्वकालिक उच्चांकावर १,८०४.२० रुपयांवर गेला.

नवी दिल्ली : १५० अब्ज डॉलर बाजार भांडवलमूल्य (मार्केट व्हॅल्युएशन) असणारी पहिली भारतीय कंपनी होण्याचा बहुमान रिलायन्स इंडस्ट्रीजने सोमवारी प्राप्त केला. मुंबई शेअर बाजारात सकाळच्या सत्रात रिलायन्सचे बाजारमूल्य २८,२४८.९७ कोटी रुपयांनी वाढून ११,४३,६६७ कोटी रुपये (१५० अब्ज डॉलर) झाले. बीएसईमध्ये रिलायन्सचा समभाग २.५३ टक्क्यांनी वाढून १,८०४ रुपयांवर गेला. एनएसईमध्येही तो २.५४ टक्क्यांनी वाढून सार्वकालिक उच्चांकावर १,८०४.२० रुपयांवर गेला.तत्पूर्वी, शुक्रवारी रिलायन्स ११ लाख कोटी रुपयांच्या बाजार मूल्याचा टप्पा ओलांडून पुढे गेली होती. कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी रिलायन्स कर्जमुक्त झाल्याची घोषणा केल्यानंतर कंपनीचे समभाग तब्बल ६ टक्क्यांनी वाढल्यामुळे ११ लाख कोटी बाजार मूल्याचा टप्पा गाठणे कंपनीला शक्य झाले होते. जागतिक गुंतवणूकदारांकडून तसेच राइट्स इश्यूच्या माध्यमातून दोन महिन्यांच्या आत १.६९ लाख कोटी रुपयांचा विक्रमी निधी उभा केल्यामुळे कंपनी शुद्ध कर्जातून मुक्त झाली आहे, असे मुकेश अंबानी यांनी म्हटले होते.>शेअर निर्देशांक तीन महिन्यांतील उच्चांकीऔषध निर्मिती व आर्थिक कंपन्यांच्या घोडदौडीच्या जोरावर मुंबई तसेच राष्टÑीय शेअर बाजाराचे निर्देशांक तीन महिन्यांतील उच्चांकी पोहोचले आहेत. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक दिवसभरामध्ये ४८२ अंशांनी वाढला असला तरी बाजार बंद होताना तो ३४,९११.३२ अंशांवर होता. मागील बंद निर्देशांकापेक्षा त्यामध्ये १७९.५९ अंशांची वाढ झाली होती. राष्टÑीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ६६.८० अंशांनी वाढून १०,३११.२० अंशांवर बंद झाले. ११ मार्चनंतर बाजाराने ही पातळी गाठली आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये २.०२ टक्क्यांनी वाढ झालेली दिसून आली.

टॅग्स :मुकेश अंबानी