‘आता तरी जागे जायात’ पुस्तकाचे प्रकाशन
By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST
पेडणे : नीतीमूल्ये ढासळत चाललेल्या समाजाला ‘आता तरी जागे जायात’ ही संस्कारक्षम एकांकिका मार्गदर्शक आहे, असे सुप्रसिद्ध साहित्यिक अवधुत कुडतरकर यांनी सांगितले. साधना प्रकाशन, तांबोसे प्रकाशित हृदयनाथ तांबोसकर यांच्या ‘आता तरी जागे जायात’ कोकणी एकांकिका संग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी कुडतरकर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. पेडणे शेतकरी सोसायटीच्या मिनी सभागृहात आयोजिलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. विठोबा बगळी, प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत धारगळकर, अशोक शेटगावकर, कमलाकांत तारी, लेखक हृदयनाथ तांबोसकर आदी मान्यवर उपस्थित होते. बगळी म्हणाले, नाटक हे समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे. तांबोसकर यांच्या एकांकिका संस्कारक्षम आहेत. तारी म्हणाले, आपल्या देशातील ऋषीमुनींची उज्ज्वल परंपरा आजच्या पिढीसमोर येण्याची गरज आहे. द
‘आता तरी जागे जायात’ पुस्तकाचे प्रकाशन
पेडणे : नीतीमूल्ये ढासळत चाललेल्या समाजाला ‘आता तरी जागे जायात’ ही संस्कारक्षम एकांकिका मार्गदर्शक आहे, असे सुप्रसिद्ध साहित्यिक अवधुत कुडतरकर यांनी सांगितले. साधना प्रकाशन, तांबोसे प्रकाशित हृदयनाथ तांबोसकर यांच्या ‘आता तरी जागे जायात’ कोकणी एकांकिका संग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी कुडतरकर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. पेडणे शेतकरी सोसायटीच्या मिनी सभागृहात आयोजिलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. विठोबा बगळी, प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत धारगळकर, अशोक शेटगावकर, कमलाकांत तारी, लेखक हृदयनाथ तांबोसकर आदी मान्यवर उपस्थित होते. बगळी म्हणाले, नाटक हे समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे. तांबोसकर यांच्या एकांकिका संस्कारक्षम आहेत. तारी म्हणाले, आपल्या देशातील ऋषीमुनींची उज्ज्वल परंपरा आजच्या पिढीसमोर येण्याची गरज आहे. दीप्ती कांबळी हिने सूत्रनिवेदन केले. राहुल, विकास, साईल यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ दिले. दीक्षा कांबळी हिने आभार मानले.