Join us

सेंसेक्सची रेकॉर्डब्रेक मुसंडी! पार केला 32 हजारचा आकडा

By admin | Updated: July 13, 2017 18:45 IST

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तेजीत असलेल्या शेअर बाजाराच्या निर्देशांकाने आज रेकॉर्डब्रेक मुसंडी मारली. आज बाजार उघडल्यावर

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - गेल्या काही दिवसांपासून  सातत्याने तेजीत असलेल्या शेअर बाजाराच्या निर्देशांकाने आज रेकॉर्डब्रेक मुसंडी मारली. आज बाजार उघडल्यावर शेअर बाजाराने जोरदार मुसंडी मारत 32 हजाराचा आकडा पार केला आहे. इतिहासात प्रथमच शेअर बाजाराचा निर्देशांक 32 हजारांच्या पलिकडे गेल आहे. तर शेअर बाजाराप्रमाणेच निफ्टीमध्येही तेजी दिसून आली. निफ्टीसुद्धा 9 हजार 891.70 च्या विक्रमी स्तरावर बंद झाला. 
 बुधवारी जाहीर झालेल्या महागाईच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीचा शेअर बाजारावर चांगला परिणाम होऊन बाजारात तेजी दिसून आली. आज दिवसभराच्या कारभारात सेंसेक्स 232.56 अंकांनी उसळून 32 हजार 037.38 अशा विक्रमी स्तरावर बंद झाला. तर निफ्टी 75.60 नी उसळून 9 हजार 891.70 अंकांच्या विक्रमी स्तरावर बंद झाला. अमेरमिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेच्या प्रमुखांनी व्याजदरात बदल न करण्याचे जाहीर केल्यानंतर आशियाई आणि युरोपिय बाजारात तेजी दिसून आली. 
 आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांमध्ये असलेले निराशेचे वातावरण, उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीमुळे निर्माण झालेले तणावाचे वातावरण अशा निराशाजनक वातावरणातही देशात पावसाची सुरू असलेली दमदार वाटचाल आणि लागू झालेल्या जीएसटीची सहज सुलभ होत असलेली अंमलबजावणी यामुळे बाजारात उत्साह निर्माण झाल्याचे चित्र आहे.  
त्याआधी मुंबई शेअर बाजारात गत सप्ताहामध्ये तेजीचे वारे वाहताना दिसून आले होते. सप्ताहाच्या प्रारंभी बाजार वाढीव पातळीवर सुरू झाला. संवेदनशील निर्देशांकाने ३१४६०.७० अंशांचा नवीन उच्चांक केला. त्यानंतर काहीसा खाली येऊन हा निर्देशांक ३१३६०.६३ अंशांवर बंद झाला होता.