नवी दिल्ली : नोटाबंदीमुळे जमीन-जुमला क्षेत्रात सध्या नरमाई असली तरी सहा महिन्यांत स्थिती सामान्य होईल. स्थिती सामान्य झाल्यानंतर व्यवहारांत मोठ्या प्रमाणात पारदर्शकता येईल, असे जाणकारांना वाटते.जाणकारांच्या मते, मालमत्ता विक्री क्षेत्रातील मंदी अल्पकालीन ठरेल. बेनामी मालमत्तांविरुद्ध कारवाई सुरू झाल्यानंतर परिस्थिती बदलेल. विशेषत: जमीन-जुमला नियमन आणि विकास कायदा-२0१६ ची (रेरा)अंमलबजावणी राज्य सरकारांनी सुरू केल्यानंतर स्थितीत सुधारणा होईल. नाईट फ्रँकचे व्यवस्थापकीय चेअरमन शिशिर बैजल यांनी सांगितले की, या कायद्यामुळे खरेदीदारांत विश्वासाचे वातावरण निर्माण होईल. बांधकामांचे नियमन करणारी स्वतंत्र यंत्रणा त्याअंतर्गत निर्माण केली जाणार आहे. त्याचा ग्राहकांना लाभ होईल. विकासकांना नव्या बिझिनेस मॉडेलचा स्वीकार करावा लागेल. कामांचे वेळापत्रक कठोरपणे पाळावे लागेल. ८ नोव्हेंबर रोजी केंद्रातील मोदी सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांवर बंदी घातली होती. नोटा बदलून घेण्यासाठी देण्यात आलेला ५० दिवसांचा अवधी ३० डिसेंबर रोजी संपला.ग्राहक किमती कमी होण्याच्या प्रतिक्षेतनोटाबंदीचा परिणाम म्हणून २०१७ च्या पहिल्या सहामाहीत नरमाईचाच कल कायम राहील. किमतींवर दबाव राहील. ग्राहक ‘थांबा आणि वाट पाहा’ या पवित्र्यात आहेत, त्यामुळे मालमत्तांची मागणी घसरलेलीच राहील. गृहकर्जाचे व्याजदर घटले आहेत. किमती कमी होतील, अशी अटकळ ग्राहक बांधून आहेत. त्यामुळे ते खरेदीची घाई करणार नाहीत.
मंदी अल्पकाळच !
By admin | Updated: January 3, 2017 03:07 IST