Join us

प्राप्तिकर परतावा आता थेट बँक खात्यात

By admin | Updated: June 24, 2015 00:29 IST

गेल्या आर्थिक वर्षाचे प्राप्तिकराचे विवरण भरल्यानंतर आणि प्राप्तिकर विभागाने त्याची छाननी पूर्ण केल्यानंतर, जर करदात्याला परतावा मिळणे अपेक्षित

मुंबई : गेल्या आर्थिक वर्षाचे प्राप्तिकराचे विवरण भरल्यानंतर आणि प्राप्तिकर विभागाने त्याची छाननी पूर्ण केल्यानंतर, जर करदात्याला परतावा मिळणे अपेक्षित असेल तर तो परतावा आता त्याला तातडीने मिळणार असून हा परतावा थेट करदात्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे. दोन वर्षांपूर्वी पर्यंत प्राप्तिकराच्या परताव्याच्या रकमेचे धनादेश प्राप्त करून घेण्यासाठी करदात्यांना दोन ते तीन वर्षांची प्रतीक्षा करावी लागत असे. परंतु, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या उच्चाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विभागाचे विविध पातळ््यांवरील संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले असून त्यामुळेच तातडीने परतावा देणे शक्य झाले आहे. करदात्याने प्राप्तिकराचे विवरण भरले आणि त्याची छाननी झाली की, दोन ते चार दिवसांच्या आत परताव्याची रक्कम खात्यात संबंधित करदात्याच्या खात्यात जमा होणार आहे. आजवर विभागाने परताव्याची रक्कम बँक खात्यात जमा करण्याचा मानस दोन ते तीन वेळा व्यक्त केला होता. मात्र, करदात्याचे नाव, बँक खात्यावरील नाव यामध्ये काहीशी तफावत असल्याचेही दिसून आल्याने ही प्रणाली राबविण्यात आली नव्हती. मात्र, यंदा प्राप्तिकर विवरणाच्या फॉर्ममध्ये बदल करण्यात आला असून करदात्याने बँक खाते क्रमांक देतानाच, बँकेचा आयएफएससी कोड आणि बँक शाखेचे नाव नमूद करण्यास सांगितले आहे. त्यामुळे हा परतावा जमा करणे अधिक सुलभ होणार आहे. (प्रतिनिधी)