Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाचून घेणे .. संकष्टीनिमित्त गणेश मंदिरात गर्दी

By admin | Updated: September 12, 2014 22:38 IST

कोल्हापूर : संकष्ट चतुथीर्निमित्त शुक्रवारी शहरातील विविध गणेश मंदिरात पंचामृत अभिषेक, गणेश स्तोत्र पठण.आरती असे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ओढ्यावरील सिद्धीविनायक मंदिरात गणेशाची खंडोबा म्हाळसा रुपात पूजा बांधण्यात आली होती.

गणेशोत्सवानंतर आलेल्या संकष्टी चतुर्थी निमित्त ओढ्यावरील सिद्धीविनायक मंदिरात पहाटे पंचामृत अभिषेक केल्यानंतर श्रींची पूजा बांधण्यात आली. पूजारी पंकज दादर्णे , राहूल ग˜ी, केतन पायमल यांनी ही पूजा बांधली. आज रात्री ९ वाजून १९ मिनिटांनी चंद्रोदय होता, यावेळी आरती करून भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आला. याशिवाय महालक्ष्मी मंदिरातील सिद्धीविनायक गणेश मंदिर, बिनखांबी गणेश मंदिर, पितळी गणपती, खडीचा गणपती, चंबुखडी येथील गणेश मंदिर अशा विविध गणेश मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
--------------------
१२कोल-गणेश
फोटोओळी : संकष्टी चतुर्थीनिमित्त शुक्रवारी ओढयावरील सिद्धिविनायक मंदिरात गणेशाची खंडोबा म्हाळसा रुपात पुजा बांधण्यात आली होती.
(छाया : आदित्य वेल्हाळ)