(वाचून घेणे) राज्यस्तरीय कराटेत राधानगरी तालुक्याला यश
By admin | Updated: August 21, 2014 21:45 IST
कोल्हापूर : नुकतीच बांबवडे राज्यस्तरीय कराटे स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राधानगरी तालुक्यातील सहभागी पंचवीस पैकी सोळा विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले.
(वाचून घेणे) राज्यस्तरीय कराटेत राधानगरी तालुक्याला यश
कोल्हापूर : नुकतीच बांबवडे राज्यस्तरीय कराटे स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राधानगरी तालुक्यातील सहभागी पंचवीस पैकी सोळा विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. पदक विजेते खेळाडू असे, अमोल गायकवाड , वैभव अस्वले, विजय पाटील(चाफोडी), शिवाजी टिपुगडे (राशिवडे), पृथ्वीराज बरगे(पुंगाव) यांनी सुवर्ण पदकाची कमाई केली. याचबरोबर सानिका पाटील, प्रणोती कांचनकर, स्वरांजली शिंदे (येळवडे), अक्षय गायकवाड (चाफोडी) तनुजा पाटील (कोदवडे) यांनी रौप्य पदक पटकाविले. तर उमेश पाटील, शैलेश गायकवाड, रोहीत चरापल, संकेत पाटील(चाफोडी), ओंकार उणे, कौस्तुभ पाटील (दोघेही पुंगाव) हे कास्यपदकाचे मानकरी ठरले. या सर्व यशस्वी खेळाडूंना शोटोकान कराटे-डो असोसिएशनचे अध्यक्ष रमेश पिसाळ यांचे मार्गदर्शन लाभले.