Join us
Daily Top 2Weekly Top 5

(वाचली) .. लोकांची मने जिंकणार्‍या सतेज पाटील यांना निवडून द्या : माने

By admin | Updated: September 20, 2014 22:04 IST

कोल्हापूर : उपनगरांची झपाट्याने होत असलेली वाढ व संख्या पाहता उपनगरांचा विकास करणे हे अवघड काम आहे; पण सतेज पाटील यांनी त्यांच्या अथक परिश्रमांतून उपनगरांचा विकास केला आहे. त्यांच्यामुळेच मोरेवाडीचा प्रश्न सुटला आहे. अशा लोकांची मने जिंकणार्‍या पाटील यांना पुन्हा जिंकून देऊया, असे प्रतिपादन निवृत्त शिक्षणाधिकारी नानासाहेब माने यांनी केले. सतेज पाटील यांच्या मोरेवाडी परिसरातील संपर्क दौर्‍यादरम्यान ते बोलत होते.

माने म्हणाले, मोरेवाडीच्या पाणीप्रश्नासाठी पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून साडेतीन कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणीप्रश्न सुटलेला आहे.
जिल्हा परिषदेच्या सदस्य मनीषा वास्कर, पंचायत समितीच्या सदस्या स्मिता गवळी, सुनील शिंदे, एस. के. वंदुरे-पाटील, वाय. ए. पाटील, दशरथ पाटील, बी. टी. कडोले, बी. जी. पाटील, अशोक राणे, एस. के. कुलकर्णी, आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सरपंच अमर मोरे, शुभांगी लाड, डॉ. विजय शिंदे, प्रकाश यादव, चंद्रशेखर हिडदुगी, दादासो कुंभार, संदीप घाडगे, संग्राम पोवाळकर, संभाजी शिंदे, सावित्री चव्हाण, सविता झेंडे, सुजाता कांबळे, सुनंदा कांबळे, भारती दळवी, रजनी पांढरबळे, मालती पाटील, उज्ज्वला कदम, साधना मोरे, आसिया इनामदार, कुसुम यादव, आदी उपस्थित होते.
----
फोटो : २०कोल- नानासाहेब माने
फोटोओळी : मोरेवाडी येथे संपर्क दौर्‍यावेळी बोलताना नानासाहेब माने. सोबत सतेज पाटील, आदी उपस्थित होते.