(वाचली) मी उमेदवार समजून कामाला लागा : संपतराव पवार यांचे आवाहन
By admin | Updated: September 29, 2014 21:47 IST
सडोली खालसा : करवीर विधानसभा मतदारसंघात माझी उमेदवारी समजूनच राजू सूर्यवंशी यांना विधानसभेत पाठवा, असे आवाहन माजी आ. संपतराव पवार-पाटील यांनी केले. म्हाळुंगे (ता. करवीर) येथे शेकाप, जनसुराज्य व राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार राजेंद्र सूर्यवंशी यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रघुनाथ पाटील होते.
(वाचली) मी उमेदवार समजून कामाला लागा : संपतराव पवार यांचे आवाहन
सडोली खालसा : करवीर विधानसभा मतदारसंघात माझी उमेदवारी समजूनच राजू सूर्यवंशी यांना विधानसभेत पाठवा, असे आवाहन माजी आ. संपतराव पवार-पाटील यांनी केले. म्हाळुंगे (ता. करवीर) येथे शेकाप, जनसुराज्य व राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार राजेंद्र सूर्यवंशी यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रघुनाथ पाटील होते. पवार-पाटील म्हणाले, आपल्या आमदारकीच्या काळात सांगरूळ विधानसभा मतदारसंघात विकासाची गंगा आणली; पण गेली दहा वर्षे आमदार म्हणून काम करणार्या नेत्यांनी करवीर विधानसभा वंचित ठेवण्याचे काम केले. टोल आंदोलनात सुरुवातीपासून आम्ही आंदोलने करून गुन्हे दाखल करून घेतले; पण एक विद्यमान आमदार व माजी आमदार विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून गावागावांत डिजिटल फलक लावून श्रेय लाटण्याचे काम करत आहेत. अशा फसव्या उमेदवारांना या निवडणुकीत जनता पराभूत करून १९९५ ची पुनरावृत्ती करेल. राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले, सामान्य जनतेतून मला मोठा पाठिंबा असल्याने निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशीच असेल. शेकाप, जनसुराज्य व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गावातून पदयात्रा काढली. सुभाष पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी शरद पाटील, अक्षय पाटील, तुषार पाटील, डी. एन. पाटील, शहाजी पाटील उपस्थित होते. दीपक कुंभार यांनी आभार मानले. चौकट - नरकेंनी कंत्राटदार पोसलेशेकापचे कार्यकर्ते अजित सूर्यवंशी यांनी विद्यमान आमदार व माजी आमदार यांच्यावर जोरदार टीका केली. विद्यमान आमदारांनी पाच वर्षांत कंत्राटदार पोसण्याचे काम केले आहे. कॉँग्रेसच्या उमेदवारास निवडणुकीतच मतदारसंघ दिसत असल्याची टीका सूर्यवंशी यांनी केली. फोटो - २९ कोल म्हाळुंगे ओळी - म्हाळुंगे (ता. करवीर) येथे राजेंद्र सूर्यवंशी यांच्या प्रचार सभेत बोलताना माजी आ. संपतराव पवार-पाटील.