Join us
Daily Top 2Weekly Top 5

(वाचून घेणे) वितरण बातमी आवश्यक .. जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत पन्हाळा पब्लिक स्कूल अजिंक्य

By admin | Updated: August 25, 2014 21:40 IST

कोल्हापूर : जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सतरा वर्षीय जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत पन्हाळा पब्लिक स्कूलने संजीवन स्कूलचा पराभव करीत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले.

कोल्हापूर : जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सतरा वर्षीय जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत पन्हाळा पब्लिक स्कूलने संजीवन स्कूलचा पराभव करीत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले.
पोलीस कवायत मैदान येथे झालेल्या या सामन्यात पन्हाळा पब्लिक स्कुलने ३-० अशा गोलफरकाने संजीवन स्कूलवर मात केली. सामन्यात अनिकेत कदमने दोन, तर निखिल जाधवने एक गोल केला. संपुर्ण सामन्यात पन्हाळा पब्लिक स्कूलचेच वर्चस्व होते.
विजयी संघास संस्था अध्यक्ष संदिप नरके यांचे प्रोत्साहन व प्रशिक्षक संग्राम गावडे, क्रीडाशिक्षक महेश जाधव, संघव्यवस्थापक दिपक पाटील, प्राचार्य अल्बर्ट सर, उपप्राचार्या मर्लिन यांचे मार्गदर्शन लाभले.
---
२५कोल-फुटबॉल ०१
फोटोओळी : जिल्हा क्रीडा कार्यालय आयोजित सतरा वर्षीय जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या पन्हाळा पब्लिक स्कूल संघासोबत प्रशिक्षक संग्राम गावडे, क्रीडाशिक्षक महेश जाधव, संघव्यवस्थापक दिपक पाटील आदी.