(वाचली) निधनवार्ता - २
By admin | Updated: August 22, 2014 22:11 IST
मनिषा चौगले
(वाचली) निधनवार्ता - २
मनिषा चौगलेकोल्हापूर : भुयेवाडी (ता. करवीर) येथील भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनिषा यशवंत चौगले (वय ३७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या शनिवारी सकाळी १० वाजता होणार आहे. --फोटो : २२ मनिषा चौगले (निधन) --------------शांता पंडितकोल्हापूर : नागाळा पार्क येथील डॉ. शांता बाबासाहेब पंडित (वय ८७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाच्या निवृत्त प्राध्यापिका होत्या. अर्थशास्त्र विषयावरील त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून अनेक विद्यार्थ्यांना पीएच.डी.चे मार्गदर्शनही त्यांनी केले. जुन्या काळातील नामवंत बॅरिस्टर बाबासाहेब पंडित यांच्या त्या पत्नी होत. रक्षाविसर्जन रविवारी (दि. २४) रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. --फोटो : २२ शांता पंडित (निधन)---नलीनी डांगीकोल्हापूर : जिल्हा परिषद कॉलनी, फुलेवाडी रिंग रोड येथील नलीनी मुकुंदराव डांगी (वय ८७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली व नातवंडे असा परिवार आहे. --फोटो : २२ नलीनी डांगी (निधन)----शांता पाटील कोल्हापूर : शिवाजी पेठ येथील शांता नारायण पाटील (वय ५६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (दि. २४) सकाळी नऊ वाजता होणार आहे. त्या तात्यासाहेब मोहिते सहकार प्रशिक्षण केंद्राचे निवृत्त प्राचार्य एन. डी. पाटील यांच्या पत्नी होत. -- फोटो : २२ शांता पाटील (निधन)----सोनाबाई घोटणेकोल्हापूर : सोमवार पेठ येथील सोनाबाई गणपतराव घोटणे (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (दि.२४) रोजी होणार आहे. --फोटो : २२ सोनाबाई घोटणे (निधन)--वीणा कुलकर्णीकोल्हापूर : येथील वीणा प्रसाद कुलकर्णी (वय ४५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा असा परिवार आहे.--फोटो : २२ वीणा कुलकर्णी (निधन)