(वाचली) सोमवारी बिंदू चौक ते त्र्यंबोली मंदिर मोफत बससेवा
By admin | Updated: September 26, 2014 21:40 IST
कोल्हापूर : महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टतर्फे त्र्यंबोलीदेवी यात्रेनिमित्त सोमवारी (दि. २९) दिवसभर बिंदू चौक ते त्र्यंबोली मंदिर अशी मोफत विशेष बससेवा सुरू क रण्यात येणार आहे. भाविकांनी या विशेष बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केएमटी प्रशासनाने पत्रकाद्वारे केले आहे. यासाठी केएमटीच्या काही बसमार्गांत बदल करण्यात आला आहे.
(वाचली) सोमवारी बिंदू चौक ते त्र्यंबोली मंदिर मोफत बससेवा
कोल्हापूर : महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टतर्फे त्र्यंबोलीदेवी यात्रेनिमित्त सोमवारी (दि. २९) दिवसभर बिंदू चौक ते त्र्यंबोली मंदिर अशी मोफत विशेष बससेवा सुरू क रण्यात येणार आहे. भाविकांनी या विशेष बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केएमटी प्रशासनाने पत्रकाद्वारे केले आहे. यासाठी केएमटीच्या काही बसमार्गांत बदल करण्यात आला आहे.सोमवारी ललित पंचमी व त्र्यंबोली देवीची यात्रा आहे. या दिवशी सकाळपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत बिंदू चौक ते त्र्यंबोली देवी मंदिर अशी येता-जाता ही मोफत बससेवा देण्यात येणार आहे. यात्रेदिवशी कागल व मुडशिंगी बसेसच्या मार्गांत बदल करण्यात आला आहे. बोंद्रेनगर, नाना पाटीलनगर, राजोपाध्येनगर, सरनोबतवाडी, आदी बसेसच्या मार्गांतही बदल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)=======================